लाॅकडाऊनमध्ये घराच्या टेरेस वर कुस्तीचे मार्गदर्शन
वाघोली (प्रतिनिधी) : दंगल चित्रपटांत कुस्तीचे धडे अमीर खान आपल्या मुलींना घराच्या टेरेसवर मॅट टाकून दिल्याचे आपण सर्वांनी आपण पाहिले आहे. या चित्रपटातील भागाची पुनरावृत्ती लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षक सचिन खांदवे आपल्या मुलीला कुस्तीचे धडे देऊन करीत आहेत.
नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील 43 किलो वजन गटात समृद्धी सचिन खांदवे हिने राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. राज्य पातळीवरील झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तर कुमार अजिंक्य कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकांची मानकरी ठरलेली समृद्धी खांदवे हिला कुस्ती स्पर्धेत अनेक यशाची शिखरे चालून देशाचे नाव उज्वल करायचे असल्याने समृद्धी सध्या वडिलांकडून कुस्तीचे धडे गिरवताना पहावयास मिळत आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1199919590347744/
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने अनेक ठिकाणी लॉक डाऊन तर अनेक भाग सील बंद करण्यात आलेला आहे. याच कालावधीमध्ये सुरक्षित राहण्याचा आणि घरी थांबण्याचा सल्ला शासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात येत आहे. शाळांना सुट्टी असल्याने अनेक मुले टीव्ही बसून मनोरंजनाचा आनंद लुटताना एकीकडे पाहायला मिळत आहेत.
काही पालक आपल्या मुलांना अवांतर वाचनाची सवय लावत आहेत त्यातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षक तथा मार्गदर्शक सचिन खांदवे व त्यांची पत्नी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका छाया खांदवे हे आपल्या मुलीला घराच्या टेरेसवर वरील भागात कुस्ती साठीच्या आवश्यक अशा मॅट टाकून कुस्तीचे मार्गदर्शन करून मोलाची कामगिरी करीत आहेत.