केरळात करोनासोबतच झिका व्हायरसच्या रुग्णांमध्येही वाढ

थिरुवनंतपूरम – आधीच करोना विषाणू महासाथीमुळे तणावात असलेल्या केरळ आरोग्य विभागाची डोकेदुखी झिका व्हायरसने आणखीनच वाढवली आहे. केरळमध्ये आज झिका विषाणूची बाधा झालेले आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील झिका व्हायरस बाधित रुग्णांचा एकूण आकडा आता ४६ वर जाऊन पोहोचला आहे.

याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. राज्यात सध्या झिका व्हायरसची बाधा झालेले ५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही जॉर्ज यांनी सांगितलं.

दरम्यान, केरळमध्ये करोना विषाणूचा संसर्ग अद्यापही कमी झाला नसून देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद केरळ राज्यात होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १८५३१ नव्या बाधितांची वाढ झाली. या कालावधीमध्ये १५५०७ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं तर ९८ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात करोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येत नसतानाच झिका विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.