जकार्ता – भारतीय नौदलाची युद्धनौका ऐरावत आज सकाळी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे पोहोचली. या जहाजाने इंडोनेशियात कोविड मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. कोविड साथीचा सामना करण्यासाठी हे जहाज इंडोनेशियात, 100 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजन आणि 300 कॉन्सनट्रेटर्स घेऊन गेले आहे.
आयएनएस ऐरावत हे लॅंडींग शिप टॅंक असून जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी अनेक टॅंक, दोन्ही ठिकाणी चालणारी वाहने आणि इतर लष्करी समान घेऊन जाणे हे त्याचे काम आहे. मदत कार्यात, देखील ही युद्धनौका सहभागी झाली होती, तसेच प्रशांत महासागर प्रदेशात देखील या युद्धनौकेने अनेक मदत कार्यात सहभाग घेतला आहे.
सुरक्षित भारत-प्रशांत महासागर परीसरासाठी भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश संयुक्त मोहिमा राबवत असतात. तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि सामाईक गस्तीसाठी देखील दोन्ही देशांच्या नौदलांच्या संयुक्त मोहिमा सुरू असतात.