रांजणगाव गणपती -कारेगावातील वृद्धेला करोनाची बाधा झाल्याच्या घटनेची दखल घेत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, तालूका वैद्यकीय अधिकारी आर. डी. शिंदे यांनी कारेगावात येऊन पाहणी करुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यामुळे कारेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने 3 किलोमीटर परिसरातील सीमा सील करण्यात आल्या आहेत. गावात औषध फवारणी करण्यात आली आहे.
तसेच गावातील सर्व अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.