डोर्लेवाडी : झारगडवाडीत साठ वर्षापासून वहिवाटीत असलेल्या रस्त्याचे मंजूर काम राजकीय द्वेषापोटी अडवले आहे. झारगडवाडी ग्रामपंचायतने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजकीय पुढारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेही म्हणणे ऐकून न घेता या ठिकाणचा रस्ता आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तेथील रहिवासी नागरिकांनी बारामतीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती तालुका पोलीस ठाण्यात तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे.
झारगडवाडी येथील 460 गटामध्ये बारामती सोनगाव ( बीकेबीएन ) ते धूळदेव माणिक बोरकर असा गटर व काँक्रीट रस्ता नागरी सुविधा मधून वीस लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये गटर लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आता काँक्रीट रस्त्याचे शंभर मीटरचे काम अपूर्ण आहे आणि ते काम जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी अडवण्यात आले आहे. रस्त्याची जागा आमचीच आहे आम्ही झारगडवाडी ग्रामपचायत मार्फत नागरी सुविधा मधून मंजूर झालेला पक्का रस्ता होऊ देणार नाही. यामुळे येथील साठ वर्षापासून राहणाऱ्या महिला, पुरुष, वयोवृध्द आणि शाळकरी मुलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महत्वाचे म्हणजे सन २०२० मध्ये बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे, या निवणुकीच्या एक महिना अगोदर ३१ डिसेबर २०२० ला रस्ता अडविनारांनी ग्रामपंचायतला भविष्यात या रस्त्यावर गटर व पक्का रस्ता मंजूर झाल्यास आमची कुठलीही हरकत असणार नाही असे लिहून देखील दिले आहे. असे असताना देखील जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्यासाठी हेतूने पत्रकार आणि इतर जणांच्या घराकडे साठ वर्षा पासूनचा ये-जा करीत असलेला रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे संबंधित अधिकारी यांनी शहानिशा करून रस्ता अडविनाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी यांनी केली आहे.
कितीही सह्या घ्या तरी काही उपयोग होणार नाही तुम्ही कितीही डांबराचे स्वप्न पहा मात्र रस्ताच होऊ देणार नाही. याअगोदर मंजूर झालेला रस्ता माघारी लावला होता, आम्ही राजकारण कूळून पिलो आहे राजकारणातला आम्ही किडा आहे आमच्या शिवाय भावकितल पाणही हालत नाही तुम्हाला आमच्याच वंजळी ने पाणी प्यावं लागणार अशी वल्गना माझी महिला सरपंच यांचा पती करीत सुटला आहे. या त्यांच्या बोलण्यामुळे भविष्यात मोठा वाद विवाद होण्याची शक्यता आहे यामुळे याला पोलिसांनी वेळीच आवर घालन गरजेचे असल्याचे मत सुद्य नागरिक यांच्याकडून केले जात आहे.
झारगडवाडी येथील 460 गटांमध्ये नागरी सुविधा मधून मंजूर असलेले रस्त्याचे काम अडवण्यात आले आहे. यासंदर्भात आमच्याकडे तेथील 60 वर्षापासून रहिवासी असलेल्या नागरिकांचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत आमची टीम त्याठिकाणी जाऊन शहानिशा करून, रस्ता अडवणाऱ्यांला योग्य ती समज दिली जाईल आणि संबंधिताला रस्ता करण्याचे आदेश दिले जातील.
-विलास करे ( बारामती नायब तहसीलदार )