इस्लामाबाद – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काल झालेल्या भूकंपात मरण पावणाऱ्यांची संख्या वाढून 21 झाली आहे. अफगाणिस्तानच्या दुर्गम भागांमध्ये या भूकंपामुळे आणखीन 8 जणांच्या मृत्यूची माहिती आज उजेडात आली. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये 11 जण ठार झाले आहेत.
शेकडो घरांचे छत कोसळल्यामुले 130 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यातील बहुतेक दुर्घटना अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात घडल्या आहेत.
Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा
भूकंपात 10 जण ठार झाले आणि 60 जखमी झाले, असे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे तालिबान प्रवक्ते शफीउल्ला रहीमी यांनी सांगितले. संपूर्ण अफगाणिस्तानात 800 घरांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.