लोणी देवकर, (वार्ताहर) – फेब्रुवारी अखेरीसच इंदापूर तालुक्यात सूर्य आग ओकू लागला आहे. यंदा अवकाळी पाऊस तसेच वाढता उन्हाळा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. इंदापूरमध्ये पारा ४० च्या घरात गेला आहे.
सध्या सूर्य आग ओकतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंगाची लाही लाही होत आहे. अनेक ठिकाणी शेतातील मजूर सकाळी लवकरच आपली कामे उरकून दुपारच्या वेळेला झाडांचा आसरा घेत आहेत. फेब्रुवारी अखेरीसच सूर्य आग ओकू लागल्याने पुढील दोन महिन्यात आणखी पारा किती पुढे जातोय, याची कल्पनाच न केलेली बरी. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उष्मघाताचा त्रास होत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा लक्षणीय असल्याचे चित्र स्पष्ट आहे.