बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुराना याने प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटास नकार दर्शविला आहे. इम्तियाज अली हे सध्या पंजाबी गायक अमर सिंह चमकिला यांच्यावर एक चित्रपट साकारत आहे.
“जब वी मेट’, “तमाशा’, “हायवे’ यासारखे हिट चित्रपट
देणाऱ्या इम्तियाज यांनी अमर सिंह यांच्या रोलसाठी आयुष्मानशी संपर्क साधला होता. मात्र, हा प्रस्ताव आयुष्मानने स्वीकारलेला नाही.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर गेल्या काही महिन्यांपासून इम्तियाज काम करत आहे. याप्रसंगी त्यांनी आयुष्मानशी संपर्क साधला होता. आयुष्मानशिवाय कार्तिक आर्यनही या भूमिकेचा प्रबल दावेदार मानला जात होता. पण, आयुष्मान सध्या “गुलाबो सीताबो’ आणि “शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटानंतर चार महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. यामुळे त्याने इम्तियाज यांची ऑफर नाकारली.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आयुष्मानचा “बाला’ चित्रपट नुकताच प्रदर्शित होवून गेला आहे. त्यानंतर आता तो “शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
याशिवाय तो “गुलाबो सीताबो’मध्ये प्रथमच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.दुसरीकडे इम्तियाज आपल्या आगामी “आज कल’ चित्रपटात व्यस्त आहे. यात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे.