… पत्नीने केलेली फसवणूक विवाहानंतर चार वर्षाने उघड
पुणे,दि.10- भारत मेट्रोमोनीवरुन लग्नगाठी जुळल्यावर त्यांचा संसार तब्बल चार वर्षे सुखात चालला होता. मात्र चार वर्षानंतर पतीला पत्नीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. ही फसवणूक म्हणजे पत्नीने मेट्रोमोनी साईटवर टाकलेले शिक्षण व नोकरीची माहिती खोटी असल्याचे उघडकीस आले. यानंतर पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.
अभिषेक अलोक पालीत(32,रा.उंड्री) असे फिर्यादीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने भारत मेट्रोमोनी या ऑनलाईन विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यामध्ये तीने राजस्थान टेक्निकल इंन्स्टिटयूट येथून बॅचलर ऑफ इंजिनिअचे शिक्षण पुर्ण केल्याचे तसेच मायक्रोसॉफ्ट दिल्ली येथे क्वॉलिटी टेस्टर म्हणून नोकरीस असल्याचे सांगितले होते. यामुळे फिर्यादीने तीच्याशी विवाह केला. विवाहानंतर फिर्यादीला तीचे शिक्षण इतके झाले नस्लयाचे व तीला नोकरीही नसल्याचे लक्षात आले. फिर्यादीने त्याला याबाबत विचारले असता, तीने खोटी तक्रार पोलीस स्टेशनला देईल अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादीने तीच्याविरुध्द कोंढवा पोलीवस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करत आहेत.