सारा अली खानने आपल्या मालदिवमधील सुटीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका छोट्या बोटीतून ती सागरी फेरफटका मारायला गेली होती. त्या बोटीच्या कठड्याला टेकून उभी राहिलेली, पांढऱ्या मिनी स्कर्टमधील सारा फारच गोड दिसत होती.
आणखीन एका फोटोमध्ये ती समुद्रात त्याच बोटीवर उभी असलेली दिसते आहे. या फोटोमध्ये सारा बिकीनी घातलेली दिसते आहे. याशिवाय तिने आणखीही काही फोटो अपलोड केले आहेत.
मालदिवच्या समुद्रामध्ये “अंडर वॉटर डायव्हिंग’चा फोटोही त्यामध्ये आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर भाऊ इब्राहिम अली खान देखील आहे. वॉटर स्पोर्टस खेळणे ही तिची आतापर्यंतची राहून गेलेली इच्छा तिने या सुटीमध्ये पूर्ण करून घेतली आहे.
याशिवाय पोहत असतानाचा तिचा एक व्हिडीओ देखील तिने पोस्ट केला आहे. त्यात ती अगदी मासोळीसारखी भासते आहे.
सध्या साराकडे दोन सिनेमांचे प्रोजेक्ट आहेत. त्यातील पहिला 1995 च्या “कुली नं. 1’चा रिमेक आहे.
View this post on Instagram
If paradise had a colour ???????♀️#blueheaven @luxnorthmale @ncstravels @munkoali
त्यामध्ये वरुण धवन तिच्याबरोबर असणार आहे. तर इम्तियाझ अलीच्या आणखी एका सिनेमामध्ये ती असणार आहे. या सिनेमाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. या सिनेमाचे प्रॉडक्शन सध्या सुरू आहे, असे समजते आहे.