लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान आपल्या कारकिर्दीत ड्रग्जचे सेवन करत होते, असा धक्कादायक आरोप पाकिस्तानचे माजी कसोटीपटू सर्फराज नवाझ यांनी केला आहे.
अर्थात, वाचाळवीर म्हणून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत चर्चेत राहण्याच्या त्यांच्या स्वभावावर अद्याप इम्रान यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सर्फराज आणि इम्रान यांच्यातील वितुष्ट जगजाहीर असल्यामुळे हे आरोप फारसे कोणी मनावर घेतल्याचे दिसत नाही. 1987 सालच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इम्रान माझ्या घरी आले होते व तेथे त्यांनी ड्रग्जचे सेवन केले होते. ते नेहमीच चरस व कोकेनचे सेवन करायचे, असेही सर्फराज यांनी सांगितले आहे.