नवी दिल्ली – कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत दिलेल्या काळात व्याज माफ करावे, या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी न्यायालयात झाली.
मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दुसऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहायचे असल्यामुळे या विषयावरील पुढील सुनावणी आता गुरूवारी वारी होणार आहे.सवलतीच्या काळात व्याजावरील व्याज ग्राहकांच्या खात्यात 5 नोव्हेंबरपर्यंत टाकण्याची सूचना बॅंकांना देण्यात आली आहे.