पिंपरीत 15 हजारांहून अधिक मूर्तींचे हौदात विसर्जन

पिंपरी – गेल्या काही वर्षांमध्ये नद्यांची दुरवस्था झाली आहे. हीच बाब लक्षात घेत नागरिक आता स्वयंस्फूर्तीने जलप्रदूषण रोखण्यासाठी पुढे येत आहेत. याचेच उदाहरण गुरुवारी पिंपरी शहरात पहावयास मिळाले.

पिंपरीगावातील वैभवनगर येथे बनविण्यात आलेल्या हौदांमध्ये 15 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि स्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी तीन मोठे हौद उभारण्यात आले आहेत. मंगळवार ते गुरुवारपर्यंत या दहा दिवसांत घरगुती व सार्वजनिक मंडळाचे मिळून 15 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.