मंचर येथील मिरवणुकीत मुस्लीम बांधवांचा सहभाग

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने काढण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. सहा तासांनंतर विसर्जन मिरवणुका शांततेने पार पडल्या.

मंचर येथे दुपारपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली होती. दुपारी गोवर्धन उद्योग समूह आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सरपंच दत्ता गांजळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज बाणखेले, कार्याध्यक्ष प्रविण मोरडे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, उद्योजक सतीश बेंडे पाटील, डॉ. मंगेश बाणखेले, दत्ता थोरात, अरुण बाणखेले, सुनिल बाणखेले, वसंत बाणखेले, सुहास बाणखेले, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार, मुस्लिम समाजाचे नेते अल्लू इनामदार, संतोष बाणखेले, गणेश खानदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी गणेश मंडळ मंचर, श्रीमंत पंचदिप बाजारपेठ, बालविजय मोरडेवाडी, श्री नवनाथ (घुलेमळा), गोकर्णेश्‍वर (डोबी मळा), मल्हार प्रतिष्ठान लक्ष्मी रोड, गुरुदत्त पाटीलवाडा, संकल्प, नवरत्न, भैरवनाथ, वेताळेश्‍वर तरुण गणेश मंडळांसह इतर गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×