उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल – मुख्यमंत्री

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी हो नाही करत अखेर भाजप प्रवेश केला आहे. शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उदयनराजेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज सकाळी उदयनराजे यांनी कमळ हाती घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज राजेंनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचे स्वागत करतो असे म्हटले. तसेच महाराजांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचे म्हटले. तसेच आता महाराज भाजपात प्रवेश केल्यानंतर नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून प्रचंड बहुमताने निवडूण येतील आणि लोकसभेवर पुन्हा एकदा जातील असा विश्‍वासही यावेळी फडणवीसांनी व्यक्‍त केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×