सातारा – जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.
संयुक्त पंचनामे करुन 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ, ब, क, ड मध्ये अहवाल सादर करावा. येणाऱ्या प्रस्तावांमध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.