नवी दिल्ली – सध्या आमदार खासदारांसह मोठ्या व्यापाऱ्यांवर ईडी केव्हा धाड टाकेल हे सांगणं कठीण आहे. अशातच ईडी सीबीआयवर आरोप करण्याची एकही संधी लोकप्रतीनिधी सोडताना दिसत नाहीत. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रिस अली यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या कुर्त्यावर लिहिले आहे – मी एक पुरुष आहे, ईडी आणि सीबीआय मला हात लावू शकत नाहीत.
आमदार अली यांनी ईडी सीबीआयला इशारा देत भाजपचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना टोला लागवल्याची चर्चा सध्या पश्चिम बंगालमध्ये रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने एक रॅली काढली होती त्यावेळी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांना ताब्यात घेतले होते त्यावेळी अधिकारी महिला पोलिसांना म्हणाले होते,माझ्या शरीराला हात लावू नका तुम्ही महिला आहात. याचाच आधार घेऊन अली यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे समजते.
काय घडलं होत नेमकं
आंदोलना दरम्यान भाजपचे अधिकारी यांना ताब्यात घेण्यात आलं होत त्यानंतर त्यांना पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर अधिकारी यांनी पुरुष कर्मचाऱ्याला बोलावण्याची मागणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तृणमूलकडून या भाजप आमदाराला चांगलेच ट्रोल करण्यात आले. आमदार अली देखील याच कारणामुळे थेट आपल्या कुर्त्यावर मजकूर लिहीत टोलेबाजी केल्याचे समजते.