बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डीक्रूजने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे.
इलियाना नियमित सोशल मीडियावर वर्कआउटचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिने नुकातच इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच इलियाना म्हणते, वर्क हार्ड, चिल्ल हार्डर.
इलियानाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला होता. या व्हिडिओत ति डॉस मूव्स करताना दिसत होती. दुसरीकडे एका फोटोत ती बेडवर निवांत आराम करताना दिसत आहे. तसेच एक पोस्ट करत तिने मानवीय आशा आणि सद्यस्थिती यात तुलना केली होती. यामुळे इलियाना खूपच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
Them: For heaven’s sake, sit like a lady! Me (for the billionth time): 💁🏻♀️
दरम्यान, लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून बॉलीवूडमधील सर्व शूटिंग ठप्प असल्याने सर्व सेलिब्रिटीज घरीच आहेत. या काळात सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास इलियाना लवकरच अभिषेक बच्चनसोबत द बिग बुल चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे.