करोना संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही काय केले? अधिकाऱ्यांना सवाल

पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढली खरडपट्टी

पुणे – जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्‍यांचा दौरा केला. यावेळी थेट कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय आणि बाधितांच्या घरांपर्यंत पोहचला. “संसर्ग कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले’, सोयी-सुविधा आणि स्वच्छता तर “किती लोकांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग केले’, अशी विचारणा करत जिल्हाधिकाऱ्यांनी “ऑन द स्पॉट’ अधिकाऱ्यांची “शाळा’ घेतली.

इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील कोविड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी येथील अपुऱ्या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. मीटिंगमध्ये वेळ घालविण्यापेक्षा कामाला प्राधान्य द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बारामती तालुक्‍यातही त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय आणि पुरंदरमधील कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन सूचना दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.