मुंबई – आयडीबीआय बॅंकेवरील कामकाजविषयक निर्बंध रिझर्व्ह बॅंकेने काढून टाकल्यामुळे शुक्रवारी आयडीबीआय बॅंकेच्या शेअरच्या भावामध्ये 10 टक्के इतकी वाढ झाली. एक वेळ हा शेअर 18 टक्क्यांपर्यंत वाढला होता.
सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी या शेअरची जोरदार खरेदी केली. मे 2017 मध्ये या बॅंकेवर अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले होते. मात्र बॅंकेने जाहीर केलेल्या तिसऱ्या ताळेबंदामध्ये बॅंकेची या भांडवल विषयक आणि मालमत्ताविषयक परिस्थिती सुधारली असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हे निर्बंध दूर केले आहेत.
त्याचबरोबर आगामी काळात आयडीबीआय बॅंकेने निकषांअतर्गत काम करेल असे रिझर्व बॅंकेला सांगितले आहे. या सर्वाचा सकारात्मक परिणाम आज बॅंकेच्या शेअरवर झाला.