मुंबई – आयडीबीआय बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 35 टक्के वाढ होऊन हा नफा 691 कोटी रुपये इतका झाला आहे.
बॅंकेच्या खराब कर्जामध्ये घट झाली. त्यामुळे बॅंकेला कमी तरतूद करावी लागली. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 512 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 1.27 टक्के झाली आहे. गेल्या वर्षी बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता 1.97 टक्के इतके हाती. या तिमाहीत बॅंकेला खराब कर्जापोटी फक्त 300 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी बॅंकेला खराब कर्जापोटी 1,119 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.
एचडीएफसीचा नफा वाढला
दरम्यान घरासाठी कर्ज देणाऱ्या एचडीएफसीचा नफा चौथ्या तिमाहीत 16 टक्क्यांनी वाढून 3,700 कोटी रुपये झाला आहे, गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 3,180 कोटी रुपये नफा झाला होता. सरलेल्या पूर्ण वर्षात कंपनीचा नफा वाढून 13,742 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने प्रति शेअर 30 रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे या कंपनीचा शेअर वधारला.