#ICCWorldCup2019 : सराव सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विजय

ब्रिस्टल – गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केलेल्या सुरेख खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानने 47.5 षटकांत सर्वबाद 262 धावांची मजल मारत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात खेळताना अफगाणिस्तानने 49.4 षटकांत 263 धावा करत हे लक्ष्य पार केले. यावेळी अफगाणिस्तानने सावध सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकापासुन दोघांनीही फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची लय बिघडवली. मात्र, मोहम्मद शेहझाद रिटायर्ड होऊन परतल्यानंतर आलेल्या रहमत शाह आणि झईझईने संघाचा डाव सावरला. मात्र, झईझई 49 धावा करुन परतल्यानंतर शाह आणि हशमतुल्लाह शहिदीने संघाला शतकी मजल ओलांडून दिली.

शाह बाद झाल्यानंतर आलेल्या समिउल्लाह शिनवारीला साथीत घेत शहिदीने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. मात्र, समिउल्लाह 22 तर अझगर अफगान 7 धावा करून परतल्यावर अफगाणिस्तानचा डाव धोक्‍यात आला होता. मात्र, मोहम्मद नबी आणि शहिदीने संघाला द्विशतकी मजल ओलांडून दिली. मात्र, नबी 34, गुलाबदिन नाईब आणि नजिबुल्लाह झारदान लवकर परतल्याने सामन्यात रोमांच परतला होता. मात्र, शहिदी आणि रशिद खानने अफगाणिस्तानला 263 धावा करुन देत विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानची सावध सुरुवात केली. सलामीवीर इमाम उल हक 32 तर फकर झमान 19 धावा करून परतला. यावेळी बाबर आझम वगळता इतर फलंदाज केवळ हजेरी लावत होते. त्यातच संघातील सर्वात अनुभवी फलंदाज शोएब मलिकने त्याच्या साथीत संघाचा डाव सावरल्याने पाकिस्तानने 262 धावांची मजल मारली. यावेळी बाबर आझमने 112 धावांची तर शोएब मलिकने 44 धावांची खेळी केली. मात्र, इतर पाकिस्तानी फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×