ICC Women’s Player of the Month for December : – भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्मा हिला गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
Deepti Sharma became the second India player to win the ICC Women’s Player of the Month Award 🏅
More ➡ https://t.co/eM6HI9UcXb pic.twitter.com/kq1fnXiyW6
— ICC (@ICC) January 17, 2024
दीप्ती शर्माने संघाची सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि प्रेशियस मारंज यांना मागे टाकत हा मोठा पुरस्कार जिंकला आहे. दीप्तीने गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळेच तीची या पुरस्कारासाठी आयसीसीने निवड केली आहे.
दीप्ती शर्माने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलेल्या योगदानामुळे तिला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला, तर पॅट कमिन्सच्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
Australian Open 2024 : कोको गॉफ आणि सबालेन्काचा विजयी धडाका कायम…
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने डिसेंबरमध्ये दोन कसोटी सामन्यांमध्ये तिची क्रिकेट प्रतिभा दाखवली. तिने केवळ 55 च्या सरासरीने बॅटने 165 धावा केल्या नाहीत तर तिची गोलंदाजी देखील उत्कृष्ट होती ज्यामध्ये तिने फक्त 10.81 च्या सरासरीने 11 बळी घेतले.