मेलबर्न – अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हीने येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील आपला विजयी धडाका कायम राखला आहे. गॉफने दुसऱ्या फेरीत आपलीच देश सहकारी कॅरोलिन दोलहिदेचा (Caroline Dolehide) ७-६, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व तिसरी फेरी गाठली. मात्र, त्याचवेळी ओन्स जेबुर व कॅरेलिन वांझीयांकी या स्टार महिला खेळाडूंना मात्र, पराभवाचा धक्का बसला.
Coco is in control. 😤 pic.twitter.com/3xvjCzqNig
— US Open Tennis (@usopen) January 17, 2024
पुरुष एकेरीत फ्रान्सिस तैफु व जेल मॉम्फील्स यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. गॉफने दोलहिदेचा पराभव केल्यावर आता तीची लढत अमेरिकेच्याच अलीसा पार्कसशी होणार आहे. अलिसाने ३२ व्या मानांकित लेयाह फर्नांडेजवर ७-५, ६-४ अशी मात करत तिसरी फेरी गाठली आहे. जेबुरला (Ons Jabeur) अवघ्या १६ वर्षीय मिरा आंद्रेव्हाने (Mirra Andreeva) ६-०, ६-२ असे अवघ्या ५४ मिनिटांत पराभूत केले.
वांझीयांकीलाही २० वर्षांच्या मारिया तोमाफीव्हाकडून १-६, ६-४, ६-१ असा पराभव पत्करावा लागला. बेलारूसच्या आर्यना सबालेन्कानेही (Aryna Sabalenka) घोडदौड कायम राखताना चेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडा फुर्वीतोव्हाचा ६-३, ६-२ असा पराभव केला.
The defending champ keeps on rollin’ pic.twitter.com/XkQU8UgMIN
— US Open Tennis (@usopen) January 17, 2024
पुरुष एकेरीत जेन्नीक सिन्नरने जेस्पर दी जॉंगवर ६-२, ६-२, ६-२ असा सरळ तिन सेटमध्ये पराभव केला व तिसरी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स दी मिनौरने मॅटीयो अर्नाल्दीवर ६-३, ६-०, ६-३ असा विजय मिळवला. फ्रान्सच्या मॉम्फिल्सला अर्जेन्टिनाच्या तोमास मार्टीन इशेवरीकडून ६-४, ६-४, ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. तैफुचा चेक प्रजासत्ताच्या तोमास माशे याने ६-४, ६-४, ७-६ असा पराभव केला.