India Women vs England Women Test Match Day 2 : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. भारताचा पहिला डाव आज 428 धावांवर संपला. टीम इंडियाने शुक्रवारच्या स्कोअरमध्ये आणखी 18 धावांची भर घातली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपल्यानं भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने 5 बळी घेतले. स्नेह राणाला2 बळी मिळाले. इंग्लंडकडून नट साइवर ब्रंट हिने अर्धशतक झळकावले.
Tea Break!
Strong bowling performance by #TeamIndia 💪 🤩
5️⃣ wickets for @Deepti_Sharma06
2️⃣ wickets for @SnehRana15
1️⃣ wicket each for Renuka Singh Thakur & @Vastrakarp25India will not enforce the follow-on.
Scorecard ▶️ https://t.co/UB89NFaqaJ #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hBbw2GUmBB
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2023
इंग्लंडने शेवटच्या सात विकेट्स अवघ्या 28 धावांत गमावल्या. इंग्लिश संघाला फॉलोऑन वाचवता आला नाही. मात्र, इंग्लंडला आमंत्रण देण्याऐवजी भारतीय संघच दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आहे. भारतीय संघाची स्थिती सध्या भक्कम आहे. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा क्रीजवर आहेत.
दरम्यान, भारताच्या पहिल्या डावानंतर ब्युमॉंट आणि डंकले इंग्लंडसाठी सलामीला आल्या. डंकले जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा करून ती बाद झाली. रेणुका सिंगने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 35 चेंडूत 10 धावा करून ब्युमॉंट बाद झाली. कर्णधार हीदर नाईटलाही विशेष काही करता आले नाही. 23 चेंडूत 11 धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरने नाइटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
नट साइवर ब्रंटने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिने 70 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. साइवर हिने या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. तिला स्नेह राणाने बाद केले. डॅनियल व्याट १९ धावा करून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बाद केले. दीप्तीने यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोन्स 12 धावा करून बाद झाली. अशाप्रकारे इंग्लंडचा संपूर्ण संघ 136 धावांवर गडगडला. इंग्लंडचा संघ केवळ 35.3 षटकेच खेळू शकला.
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने (Deepti Sharma)5 बळी घेतले. तिने 5.3 षटकात फक्त 7 धावा देत 4 मेडन षटके टाकली. स्नेह राणा हिने 6 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाड हिला एकही यश मिळाले नाही. तिने 6 षटकात 25 धावा दिल्या.
INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…
दरम्यान, याआधी टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 94 षटकांत 7 गडी गमावून 410 धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा 60 धावांवर आणि पूजा वस्त्राकर 4 धावांवर नाबाद होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अन् टीम इंडियाला 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 18 धावा करता आल्या. टीम इंडियाचा पहिला डाव 104.3 षटकात 428 धावांवर आटोपला.