#ICC : कसोटी क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम

दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, भारताच्या अजिंक्‍य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांची घसरण झाली आहे.

विराट कोहलीच्या खात्यात ९२८ गुण असून, स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलियाचा फाॅर्मात असलेला मार्नस लबुशेन याने १४ कसोटीतच ८२७ गुणांसह तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरूध्दच्या तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ५४९ धावा काढल्या आहेत.

भारतीय फलंदाज चेतेश्वर पूजारा ७९१ गुणांसह सहाव्या, तर अंजिक्य रहाणेची ७५९ गुणांसह नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.