एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीचे सरकारला आव्हान
नवी दिल्ली : देशात एकीकडे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने, निदर्शने होत आहेत तर दुसरीकडे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठे विधान केले आहे. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असे ओवेसींनी म्हटले आहे.
A Owaisi: Jo Modi-Shah ke khilaaf awaaz uthayega woh sahi maayne mein mard-e-mujahid keh layega…Main watan mein rahunga,kaagaz nahi dikhaunga. Kagaz agar dikhane ki baat hogi toh seena dikhayenge ki maar goli. Maar dil pe goli maar kyunki dil mein Bharat ki mohabbat hai.#CAA pic.twitter.com/5VOPBgK8Ze
— ANI (@ANI) February 10, 2020
जो मोदी-शाह यांच्याविरोधात आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद ठरेल. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागितली तर छाती दाखवू मारा गोळी. हृदयावर गोळी मारा कारण हृदयात भारताचे प्रेम आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.
या अगोदर ओवेसींनी लोकसभेत बोलताना, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) नागरिकत्व देतोपण आणि घेतोपण असे म्हटले होते. तसेच, आसाममध्ये 5 लाख मुस्लीमांची नावे नाही आली. मात्र आसाममधील बंगाली हिंदूंना नागरिकत्व देऊ इच्छित आहेत…मी घुसखोर नाही घुसखोरांचा बाप आहे. एनपीआर-एनआरसी एकच आहे, असही ते म्हणाले होते.