पत्नीला प्रियकरासोबत घरात नको त्या अवस्थेत बघितलं, संतापलेल्या पतीने…

नवी दिल्ली –  पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळताच दोन सख्ख्या भावंडांनी विटा आणि दगडांनी ठेचून एका व्यक्तीचा  खून केला. ही घटना यूपीच्या कानपूरमधील गावात घडली असून, या घटनेनंतर एकच खळबळ माजली.  

पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरु केला असून चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की,’पतीने त्याच्या पत्नीला एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर तो हैराण झाला. अखेर संतापलेल्या पतीने आपल्या भावासोबत त्या व्यक्तीची हत्या केली.’ 

आरोपी पतीला आपल्या पत्नीनेचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आपली पत्नी  बऱ्याच वर्षांपासून  लपूनछपून एक व्यक्तीला भेटायची मात्र,  गेल्या रात्री  पती घरात नव्हता, पत्नी एकटीच होती. तिने त्या व्यक्तीला आपल्या घरी बोलवलं. तिचा प्रियकर तिच्या घरी पोहोचला.

यातच काही वेळात पती घरी पोहताच त्या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून तो हैराण झाला.  यावेळी संतापलेल्या पत्नीने  आपल्या भावासोबत  विटा-दगडांनी ठेचून त्याची हत्या केली. त्यावेळी झालेल्या आवाजानं आजूबाजूचे लोक गोळा झाले. दरम्यान,  याप्रकरणात त्यांनी चौघांना अटक केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.