नवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे आपण रामदेव बाबा यांनी लवकरच ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत, असा दावा केला आहे.
हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,’मी १८ – १८ तास सेवाकार्य करत असून लवकरच ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगसवरील औषध घेऊन येत आहोत . ही औषध आयुर्वेदाच्या माध्यमाने देणार आहे.’
ते पुढे म्हणाले,’माझ्यावर अनेक प्रकारचे वाद उद्भवले असले तरी मी एका आठवड्याच्या आत ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत. यावरचे काम झाले आहे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,” असे स्वामी रामदेव बाबा यांनी हा दावा केला.
दरम्यान, IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय.
एलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्सअॅप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी केलाय.