Patanjali Misleading Ad Case । पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव कोर्टात पोहोचले आहेत. त्याचवेळी, न्यायालयात येण्यापूर्वी बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने जाहीर माफी मागितली. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देण्यासारख्या चुका भविष्यात पुन्हा होणार नाहीत, असे सांगण्यात आले. न्यायालयाची प्रतिष्ठाही राखणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे
दरम्यान, रामदेव बाबाच्या माफीनाम्यावर सुनावणी करताना न्यायालयाने, तुमच्या भ्रामक जाहिरातीएवढा मोठा माफीनामा आहे का ? असा सवाल उपस्थित केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रात जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये पतंजली आयुर्वेदने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले आहे की ते न्यायालय आणि संविधानाची प्रतिष्ठा राखण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहेत. जाहीर माफीनाम्यात, बाबा रामदेव यांनी पतंजलीची जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल आणि त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात निवेदन देऊनही पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल माफी मागितलीय.
पतंजलीने माफीनाम्यात काय म्हटले आहे? Patanjali Misleading Ad Case ।
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदकडून ही माफी अशा वेळी आली आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना फटकारले होते. त्यात म्हटले आहे, “पतंजली आयुर्वेद माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा पूर्ण आदर करते. आमच्या वकिलांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात निवेदन दिल्यानंतरही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात झालेल्या चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
माफीनाम्यात पुढे म्हटले आहे की, “आम्ही आमची वचनबद्धता व्यक्त करतो की भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कटिबद्ध राहू.”
आयएमएकडून पतंजिलविरोधात याचिका दाखल Patanjali Misleading Ad Case ।
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांचे योगातील योगदान मान्य केले आणि ते आणि आचार्य बाळकृष्ण यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे सांगितले. दोघांना त्यांची चूक सुधारण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजली विरोधात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये कंपनीने आधुनिक औषध आणि कोविड-19 लसीविरुद्ध अपप्रचार केल्याचा आरोप केला होता.
.