नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी काल भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले. महिला कुस्तीपटूंकडून एफआयआरमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एफआयआर दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण यांनी,”मी निर्दोष आहे आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो असे असे त्यांनी म्हटले आहे.
#WATCH | “I have not yet received the FIR copy. I will speak once I’ve received the FIR copy,” says Brijbhushan Sharan Singh, President, Wrestling Federation of India on wrestlers’ protest against him and FIRs registered by Delhi police pic.twitter.com/FvU1FxkI35
— ANI (@ANI) April 29, 2023
दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप लावले आहेत. या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे. ब्रिजभूषण म्हणाले की, एफआयआर दाखल करण्याबाबत चर्चा झाली आहे. एफआयआरची प्रत सध्या माझ्याकडे नाही. पण एफआयआर झालीच असेल. मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. माझी काही तक्रार नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी या आरोपांना सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह दिली आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीत धरणे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या या लढ्याला अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे.