छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागांवर भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे.
या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अभिजीत देशमुख, मुरली चौधरी, दत्ता उकिरडे, जनाबाई ठोंबरे, भागचंद ठोंबरे, श्रीराम शेळके, राधाकिसन पठाडे, गणेश दहीहंडी, सुजाता गायके, भागिनाथ नावपुते, पुनमचंद बामणे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे.
तर महेंद्र खोतकर, अब्दुल रहीम, कैलास उकिरडे आणि जगन्नाथ काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.