मुंबई – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केलं आहे.