…तर कायद्याची गरजच काय? : मनेका गांधी

नवी दिल्ली – हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. यावर जे काही झाले ते देशासाठी फार भयानक होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मनेका गांधी यांनी दिली.

मनेका गांधी म्हणाल्या कि, जे काही झाले ते देशासाठी फार भयानक होते. तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही लोकांना मारू शकत नाही. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे न्यायालयात फाशीची शिक्षा झाली असते. असे एन्काऊंटर होऊ लागले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काय फायदा? कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही मारत असाल तर न्यायालय, कायदा आणि पोलिसांची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.