नवी दिल्ली – सध्या देशासह संपूर्ण जगात करोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. दररोजच्या करोना रुग्णांमुळे संपूर्ण जगातील देशांवर ताण आला आहे. करोनाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी सर्व देशांकडून लस आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसीबाबत आताही लोकांमध्ये संभ्रम असून लस घेण्यास लोकांना कडून पाठ दाखवली जात आहे.
लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. अश्यातच आता नागरिकांनी लवकरात लवकर करोना लस घ्यावी यासाठी सर्व देशातील सरकारकडून भन्नाट आयडिया लढविली जात आहे. काही ठिकाणी लास घेतल्यास बिअर मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर काही ठिकाणी सरकारकडून ऑफर, बक्षीस आणि कठोर नियम करुन नागरिकांना लस घेण्यास भाग पाडावं लागत आहे.
Vaccinated bride seeks vaccinated groom! No doubt the preferred marriage gift will be a booster shot!? Is this going to be our New Normal? pic.twitter.com/AJXFaSAbYs
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 8, 2021
यातच सध्या सोशलवर क जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये कोविशील्ड लस घेतलेला ‘वर’ हवा असा मजकूर एका तरुणीने दिली आहे. ह्या जाहिरात वधूपक्षानं दिलेली आहे. त्यात ते असं सांगतात, रोमन कॅथोलिक मुलगी आहे, तिची 24/5’4″ वय- उंची आहे. तिनं गणितात M.Sc केलेलं आहे. सेल्फ एम्पलॉईड आहे. आणि पुढं लिहिलंय, कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशी अट या जाहिरातीत देण्यात आली आहे.
सध्या सोशलवर ही जाहिरात चर्चेत असली असून काहींनी ही जाहिरात खोटी असल्याचे म्हंटले आहे. तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ही जाहिरात शेअर केली असून हे न्यु नॉर्मल आहे का? असे म्हटले आहे.