पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पाे कंटेनरवर आदळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तीन जण किरकोळ जखमी झाले आहे. रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
भरत मोहन जगदाळे, वय ३१ असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे, मुलगी ऋतिका भरत जगदाळे, चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे असी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या अपघाताची नोंद रसायनी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला असताना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ टेम्पो(क्रमांक एम एच-24,एयु-5831) आला असता पहाटेच्या सुमारास अचानक टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो समोरील कंटेनर वर उजव्या बाजूने धडकला.