पिंपरी – पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. ही घटना रावेत येथे बुधवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. वृक्षाली गणेश लाटे (वय ४०, रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (४५) यांनीही आत्महत्या केली.
वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीचा हातोडी डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पत्नी वृषाली या आजारी होत्या. आजारपणात त्यांना होणाऱ्या यातना सहन न झाल्याने त्यांचा खून करून आपण आत्महत्या करीत असल्याचे गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.