मुंबई – ZEE5 वर हुमा कुरेशीच्या आगामी चित्रपट तरलाचा टीझर बाहेर आला आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी सेलिब्रिटी शेफ आणि फूड रायटर तरला दलाल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. हुमा कुरेशीने तिच्या नवीन चित्रपटातिला लुक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नेहमीच चित्रपटांमध्ये हॉट अँड बोल्ड भूमिका निभवणारी हुमा या चित्रपटात वेगळीच दिसत असल्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या लूकवरून तिला सोशल मीडियावर संमिश्र कंमेंट्स येत आहे. होतीस तू काय झालीस तू असं म्हणत तिच्या या लूकवर प्रतिक्रिया दिली आहे.
सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांचे 2013 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. 2007 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावर आधारित हा बायोपिक असल्याचे म्हंटले जात आहे.
तरला दलाल यांनी ‘तरला दलाल शो’ आणि ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ सारखे लोकप्रिय कुकिंग शो होस्ट केले. पियुष गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी परंतु नवशिक्या शेफची प्रेरणादायी कथा असेल जो आपल्या कठोर परिश्रमाने स्वयंपाक तज्ञ आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी बनला.