मुंबई – महादेव बेटिंग ऍप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर पाठोपाठ ईडीने आणखी दोन अभिनेत्यांना समन्स बजावले आहेत. कॉमेडीयन कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला हे समन्स जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या यादीमध्ये अभिनेत्री हिना खानचेही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरची शुक्रवारी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पंरतु त्यासाठी रणबीर कपूरकडून दोन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला आहे.
त्याच पाठोपाठ आता या यादीमध्ये आणखी तीन अभिनेत्यांची नाव जोडली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. महादेव बुक ऍप प्रकरणी ईडीकडून सध्या चौकशी करण्यात येत आहे.
यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं सध्या पुढे येत आहेत. या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी महादेव बुक ऍपसाठी जाहिरात केली असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.