मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा तिच्या प्रश्नांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते.हुमाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.कारण भल्या भल्यांना जमणार नाही असा अभिनयन हुमाने करून दाखवला आहे. हुमा नेहमीच आगळ्यावेगळ्या भूमिका करण्यासाठी चर्चेत असते. नुकतंच हुमाने बॉडी शेमिंगबाबत केलेलं वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे.
हुमाला आपल्या स्टाईल आणि बॉडीबाबत सोशल मीडियावर नेहमीच निगेटिव्ह कमेंट मिळतात. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान याच निगेटिव्हिटीबाबत हुमाला विचारण्यात आलं त्यावर ती म्हणाली,अभिनेत्री म्हणून मला समजायला हवं की मी जे करते ते योग्य आहे किंवा नाही. म्हणून यासाठी मला सुरुवातीला सोशल मीडियावरील प्रतिक्रिया महत्वाच्या वाटायच्या. मात्र जास्त प्रतिक्रिया निगेटिव्ह असल्यामुळे मला वाटलं कि माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय.यामुळे माझा आत्मविश्वास देखील कमी झाला होता”
हुमा पुढे म्हणते,मला सुरुवातील अभिनयावरून अनेकांनी गृहीत धरलं होत. परंतु मी सोशल मीडियाचे आभार मानते कारण यामुळे मला माहिती पडलं की लोक माझ्याविषयी किंवा चित्रपटांबद्दल काय विचार करतात. आता सर्वजण मला माझ्या अभिनयासाठी ओळखतात आणि मला हेच महत्वाचं आहे. मी निगेटिव्हिटीकडे जास्त लक्ष न देता पुढे जाते आणि तेच महत्वाचं आहे. असं हुमाने यावेळी स्पष्ट केलं.
यानंतर हुमाने आपल्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील पात्राबाबत सांगितलं. हुमा म्हणते,या चित्रपटासाठी मला 75 हजारांचे मानधन मिळाले होते.एवढेच नाहीत तर हुमाने आपला पहिला चित्रपट अत्यंत लो असल्याचे सांगितलं. यावेळी हुमाला तीन महिन्यांसाठी बनारसमध्ये साध्य घरामध्ये रहावे लागले होते. यावेळी तीला ना कोणती व्हॅनिटी व्हॅन देण्यात आली होती ना लक्झरी हॉटेल होते.