लंडन – लोकांच्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन के युक्त पदार्थ असतील तर हृदयविकाराचा धोका कमी होतो असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे व्हिटॅमिन के चा समावेश असलेल्या पदार्थांमुळे रक्तातील कॅल्शिअम चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते असा दावाही संशोधकांनी केला आहे .
या विषयावर काम करणाऱ्या संशोधकांनी गेल्या तेवीस वर्षांच्या कालावधीत 50000 रुग्णांची माहिती गोळा करून त्याचे संशोधन करून हे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि चरबी यांचे प्रमाण जर कमी करायचे असेल आपल्या आहारामध्ये विटामिन के युक्त पदार्थ वाढवावेत असा सल्लाही या संशोधकांनी दिला आहे व्हिटॅमिन केच्या वापरामुळे हृदयविकाराची संबंधित एस्टिरॉससिरिसिस या रोगाचे प्रमाण आणि धोका कमी होतो असेही संशोधकांनी म्हटले आहे.
या रोगांमध्ये रक्तवाहिन्यात फॅट आणि कोलोस्ट्राल वाढल्यामुळे त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्या बाद होण्याचा धोकाही वाढतो हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विटामिन के दोन प्रकारचे असते विटामिन के वन हे हिरव्या भाज्या आणि तेले अशा माध्यमातून मिळू शकते के टू हे व्हिटॅमिन अंडी मटण आणि चीज यासारख्या पदार्थातून मिळू शकते ज्या रुग्णाला अथरोस्क्लेरोसिसचा आजार झाला असेल आणि त्याने आपल्या आहारामध्ये विटामिन के वनचे प्रमाण वाढवले तर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाण आणि धोका 21 टक्क्याने कमी होतो असा दावा संशोधकांनी केला आहे.
न्यू एडिथ कोवन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले असून या संशोधकांचे प्रमुख डॉक्टर निकॉला बॉण्डना यांनी दिलेल्या माहितीनुसार विटामिन के चे प्रमाण वाढल्यामुळे केवळ अथरोस्क्लेरोसिस या रोगापासून बचाव होतो असे नाही तर हृदयविकाराची संबंधित इतर आजारही दूर राहू शकतात.