चिंबळी -एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करुन पाच लाख 25 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
ही कारवाई मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास नवीन 90 फुटी रोड, मोशी येथे करण्यात आली.
संजय सदाशिव मोहिते (वय 40, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.