नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केले आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आले . हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आले .
नेमके कसे काम करते ‘करोनिल’?
आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केले आहे. या ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश असल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. करोनामध्ये संक्रमित रूग्णांमध्ये या औषधाबद्दल क्लिनिकल चाचण्या घेतलेल्यांमध्ये 100 टक्के निकाल पाहिले गेले आहेत.
कोरोनिल औषध हे सकाळी आणि संध्याकाळी एकदा घ्यावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
दरम्यान, करोनिल औषधाच्या चाचणी रुग्णांवर घेण्यात आल्या असून यातील ६९ टक्के रुग्णांचे अहवाल केवळ तीन दिवसात निगेटिव्ह आले आहे. तर पुढच्या 7 दिवसांत करोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल, असा दावाही केला आहे. तसेच यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. या औषधाचा प्रयोग आतापर्यंत २८० लोकांवर करण्यात आला असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे.