Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे नवीन रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आजपासून (मंगळवार) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक आणि इतर राज्यांतील अभ्यागत, अयोध्येतील मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी काल रात्रीपासूनच मंदिर मार्गावर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. अशात प्रत्येक भारतीयाला मूर्ती विषयी अधिका अधिक माहिती जाणून घ्याची आहे. अशात रामललाच्या मूर्तीच्या उंचीबाबत सोशल मीडियावर भाविक माहिती सर्च करतांना दिसत आहे
या मूर्तीला अरुण योगीराज यांनी साकारले आहे, ते प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहे. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. अरुण यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. योगीराज सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे.
अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता यांनी मूर्तीबाबत माध्यमांशी बोलतांना सांगितले, ‘रामललाची मूर्ती 5 वर्षांच्या रामाच्या रूपात असून त्यांची उंची 51 इंच आहे. प्रत्येक रामनवमीच्या दिवशी दुपारी सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर पडावीत म्हणून मूर्तीची लांबी 51 इंच ठेवण्यात आली होती. याचा अर्थ प्रत्येक रामनवमीच्या दिवशी रामललाच्या कपाळावर सूर्यप्रकाश येईल. गर्भगृहात स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीवर कमळाच्या फुलाची स्थापना करण्यात आली आहे. कमळपुष्प असलेल्या मूर्तीची उंची 8 फूट आहे. मूर्तीचे वजन 200 किलो आहे.’
तर मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. रामललाची मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे. या दगडाची खास गोष्ट म्हणजे या दगडावर दुधाचा अभिषेक केल्याने कोणताही परिणाम होत नाही. या दगडाला कोणत्याही प्रकारच्या आम्ल किंवा इतर पदार्थामुळे इजा होणार नाही आणि हजारो वर्षे असाच राहील.
दरम्यान, मूर्ती बघितल्यानंतर असे लक्षात येते कि,जीवंत रूप देण्यात योगीराज यशस्वी झाले आहे. अनेकांना असा प्रश्न आहे की मूर्तीला जिवंत रूप कसे देण्यात आले. याबाबत सांगायचे झाल्यास, योगीराज यांनी सर्वात पहिले मूर्ती बनवण्यापूर्वी कागदावर स्केचिंग केले त्यानंतर रामललाचा चेहरा, डोळे, नाक, गाल, ओठ आणि हनुवटी कारागिरीनुसार बनवण्यात आली होती.
योगीराजांनी मानववंशशास्त्रावरील अनेक पुस्तके वाचली जेणेकरून त्यांना मानवी शरीराची भाषा आणि शरीरशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. पुस्तकांच्या सहाय्याने सजीव दिसणारे शिल्प तयार करण्यात योगीराज यशस्वी झाले.’
दरम्यानच्या काळात, अरुण योगीराज यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या जेणेकरून त्यांनी लहान मुलांचे बारकाईने निरीक्षण केले. मुलांच्या हसण्यावर आणि भावविश्वावर त्यांनी खूप संशोधन केले. अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता यांनी सांगितले की, या गोष्टींचे पालन करून योगीराजांनी एक उत्कृष्ट नमुना तयार केला.