‘Sri Ram Janmabhoomi Darshan’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. प्राण-प्रतिष्ठपणा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्या दरम्यान, प्रभू रामाच्या बाळ रुपातील मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा आणि पुजा यावेळी करण्यात आली. दरम्यान, हा सोहळा अयोध्येसह देशभरात अत्यंत उत्साहात पार पडला. दरम्यान या सोहळ्यानंतर आता भाजपचे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन अभियान राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ‘श्री रामजन्मभूमी दर्शन’ मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील सर्व संसदीय मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याची तयारी या अभियानातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 24 जानेवारीपासून भाजपच्या ‘श्री रामजन्मभूमी दर्शन’ मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत अयोध्या धाममध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे चोख बंदोबस्त करून त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी भाजपच्या जिल्हा युनिटला सोपविण्यात आली आहे. भाविकांच्या स्वागताची जबाबदारी जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील सर्व संसदीय मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्यासह अनेक बडे नेते या मोहिमेवर थेट लक्ष ठेवून आहेत आणि ते यशस्वी होण्यासाठी अयोध्या जिल्हा युनिटच्या संपर्कात आहेत. 24 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा अयोध्येतील राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर आम्ही ही मोहीम सुरू करू. असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. भाविकांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते व्यवस्था करतील भाजपचे अयोध्या जिल्हाध्यक्ष संजीव सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना, देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली असताना आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. यासोबतच त्यांची राहण्याची सोय, वाहतूक, योग्य आहार आणि वैद्यकीय सुविधा या सर्व गोष्टींची आम्ही काळजी घेऊ. असे म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील भाजपच्या अयोध्या युनिटने येथे येणाऱ्या 25,000 भाविकांच्या राहण्याची व्यवस्था आधीच केली आहे. या ठिकाणी राम भजन, कीर्तन आणि राम लीलासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे भाजप नेत्याचे म्हणणे आहे. परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही पूर्ण काळजी घेतली जाईल. दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या भाविकांची भाषिक अडचण होऊ नये, यासाठी त्याच राज्यातील भाजपची टीम व्यवस्था करेल. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी भाजपने विविध राज्यांतून सुमारे 500 कार्यकर्त्यांना बोलावले असून ते अयोध्येत भाजपला पूर्ण पाठिंबा देतील. दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या भाविकांशी समन्वय साधण्यासाठी त्याच राज्यातील कामगार तैनात केले जातील. ज्याला त्या राज्याच्या भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजीही कळेल.असेही म्हटले जात आहे.