मुंबई – सोशल मीडियावरील टीव्ही अँकर आणि अभिनेत्री महालक्ष्मी सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चित्रपट निर्माते रवींद्रन चंद्रशेखरशी लग्न केले आणि तेव्हापासून तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रवींद्रनसोबत तिचे वैवाहिक जीवन सुरू करताना तिला खूप आनंद झाला असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअरही केली आहे.
View this post on Instagram
रवींद्रन आणि महालक्ष्मी यांच्य लग्नाचे फोटोवर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो पाहुन एक युजरने लिहीले की,’कधी विचार नाही केला की हि लव्ह स्टोरी सुद्धा यशस्वी होईल.’
दोघांनी तिरुपतीमध्ये लग्न केले आणि चेन्नईमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टीही दिली. लग्नानंतर, दरम्यान, टीव्ही अँकर महालक्ष्मी आणि रवींद्रन चंद्रशेखरन यांच्या वयातील अंतराबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
महालक्ष्मीचा जन्म 21 मार्च 1990 रोजी झाला असून तिचे वय 32 वर्षे आहे. तर तिचे दुसरे पती रवींद्रन चंद्रशेखरन यांचा जन्म 1 जून 1970 रोजी झाला असून ते 52 वर्षांचे आहेत. अशा प्रकारे दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक आहे.
टीव्ही होस्ट महालक्ष्मी निर्माता रविद्रन चंद्रशेखरन यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. मात्र, प्रेमाला वयाची मर्यादा नसते किंवा जन्माचे बंधन नसते. अशीच जोडपी लग्नासारख्या पवित्र नात्यातही बांधली जातात. आता या दोघांमधलं प्रेम कसं फुललं आणि लग्न करण्यामागचं खरं कारण काय आहे. यावर आता सोशलवर मीडियावर चाहते अंदाज बांधताना दिसत आहे.
View this post on Instagram
महालक्ष्मी आधीच विवाहित असून तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट देणारी महालक्ष्मी काही काळ अविवाहित जीवन जगत होती आणि आता निर्माते रविद्रन चंद्रशेखरन यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने पुन्हा वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. अभिनेत्रीचे आधी अनिल कुमारसोबत लग्न झाल्याची माहिती आहे. 2019 मध्ये दोघे वेगळे झाले; त्यांना एकत्र एक मुलगा आहे.
महालक्ष्मी आणि रवींद्रन यांची भेट ‘विदुम वरई काथिरू’ (विडियम वरई काथिरू) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केले, ज्याचे रुपांतर प्रेम आणि लग्नात झाले.
View this post on Instagram