मुंबई – सध्या कौन बनेगा करोडपतीमुळे चर्चेत असलेले बॉलिवूडचे अमिताभ बच्चन आणखी एक धमाका करणार आहेत. एकामागून एक दर्जेदार चित्रपट आणून अमिताभ आपला टाइम अजून संपला नसल्याचा दाखला देत आहेत. नुकतच त्यांनी आगामी चित्रपट गुड बायचा फर्स्ट लूक शेअर केला. या पोस्टरमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका देखील दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर गुडबाय या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “कुटुंबाचा साथ सर्वात खास असतो, कोणीही जवळ नसतानाही त्यांची आठवण कायम राहते”. यासोबतच अमिताभ यांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट पुढील महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पोस्टरवरून तरी हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याचे समजते. मुलगी आणि वडिलांचं नातं या चित्रपटामधून दाखवलं जाऊ शकत असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पुष्पा सारख्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली रश्मीका थेट बिग बींसोबत स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.