वीसगाव खोरे, (वार्ताहर) – उत्रौली (ता.भोर) येथील स्वप्नील सुरेश कुंभार यांना जागतिक लाईनमन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, निरा विभागामार्फत उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांच्या हस्ते आदर्श प्रधान तंत्रज्ञ म्हणून सन्मानित करण्यात आले.
तांत्रिक विभागात काम करीत असतांना सन २०२३-२४ केलेल्या अविरत सेवेत केलेली विना अपघात सेवा, सुरळीत वीजसेवा, रोहित्र काळजी, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्येंचे त्वरित निराकरण करणे, वीजबिलाची थकबाकी कमी करणे,
कामाच्या ठिकाणाची देखभाल इत्यादी क्षेत्रात कर्तव्यदक्ष, निष्ठा व श्रम दाखवून केलेल्या गौरवास्पद कार्याबद्दल आपले लाईनमन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक अभियंता योगेश बुरसे, सहाय्यक अभियंता सुदर्शन लवाड, शशिकांत बोधले, अलीम मन्यार, निरा उपविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.