वीसगाव खोरे, (वार्ताहर) – धोंडेवाडी, चिखलगाव (ता.भोर) येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने महिलांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
महिलांचे हक्क कोणते आहेत तसेच महिला दिन का साजरा केला जातो, याविषयी मार्गदर्शन सविता तनपुरे यांनी केले. सिंधू भिलारे, शांता शिरगावकर, लता धोंडे, सुषमा सुतार, आशा शिरगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी धोंडेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सोपान धनावडे, विठ्ठल धोंडे, सीमा शिरगावकर, रघुनाथ पारठे ,केंद्र प्रमुख अंजना वाडकर,किसन धोंडे, अंकुश भिलारे, दत्तात्रय धोंडे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक जयवंत जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले सविता तनपुरे यांनी विविध स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्या.अनिता पवार आभार मानले.