कोलंबो: श्रीलंकेत 95 नौदल अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व सुरक्षा दलातील कर्मचार्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक आदेशात म्हण्टले आहे कि, जे कर्मचारी सुटीवर आहेत त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे. श्रीलंकेचे लेफ्टनंट जनरल शवेंद्र सिल्वा यांनी सांगितले की, वेलीसारामधील 95 नौदल अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. “यापैकी 68 जणांना एका शिबिरात कोरोनाची बाधा झाली तर 27 जणांना सुटीवर असताना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, नौदलातील काही अधिकाऱ्यांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. शनिवारी नौदलातील प्रकरणानंतर सुमारे चार हजार जवानांना एक नौदलाच्या शिबिरात ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून काढल्यामुळे कोरोनाचा प्रसार प्रतिबंध होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून श्रीलंकेची राजधानीसहित अन्य ठिकाणी चार मी पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
न्यूझीलंडमध्ये 1 हजार 469 कोरोनाबाधित रुग्ण सोमवारी न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पाच नवीन प्रकरणे समोर आली आहेत. मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन नियमात शिथिलता देण्याची तयारी आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्र्डन यांनी सांगितले कि, देशात आतापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकला नाही. बांधकामांसह काही व्यवसायांना मध्यरात्रीपासून उघडण्यास परवानगी दिली जाईल, परंतु सोशल डिस्टंशिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.